कोर्लई,ता.७(राजीव नेवासेकर) रोहा -कोलाड येथे नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या मुरुड तालुक्यातील बोर्ली येथील रहिवासी नांदगाव प्राथमिक शाळा क्र.१ च्या शिक्षिका सौ.संगिता उदय खानावकर यांना महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षण समिती(रायगड) चा गुरुगौरव पुरस्कार-२०२५ मिळाल्याबद्दल सर्वत्र कौतुक व अभिनंदन केले जात आहे.
संगीता खानावकर यांना या पूर्वी २०२३-२४ मध्ये महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग ,रायगड शाखा यांच्या वतीने जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला होता.आपल्याला महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षण समिती(रायगड) चा गुरुगौरव पुरस्कार-२०२५ मिळाल्याबद्दल संगिता खानावकर यांनी समाधान व्यक्त केले असून शिक्षण क्षेत्रात आपले मोलाचे योगदान राहील. असे सांगितले.त्यांना मिळालेल्या पुरस्काराचे सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील विविध मान्यवर तसेच आप्तेष्ट नातेवाईक मित्र परिवार व पदाधिकारी शिक्षक बांधवांकडून कौतुक व अभिनंदन केले जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या