कोर्लई,ता.१(राजीव नेवासेकर) राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्ताने मुरुड वसंतराव नाईक महाविद्यालय, आदिवासी विकास सेवा संघ, नेहरू युवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने प्राचार्य डॉ.जे.के.कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली मेरा युवा भारत अभियानांतर्गत स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
मुरुड तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ.राजेंद्रकुमार खताळ,बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखेचे शाखाधिकारी हेमंत पाध्ये, आदिवासी विकास सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष भारत बागवे, प्राचार्य डॉ.जे.के.कांबळे, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.एस.एस.भैरगुंडे,प्रा.डॉ.जी.डी.मुनेश्वर, प्रा.डॉ.सिमा नाहिद,प्रा.चिंतन पोतदार,प्रा.प्रणव बागवे, प्राध्यापक उपस्थित होते.
सुरुवातीला सर्व उपस्थितांचे स्वागत करण्यात येऊन मान्यवरांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात येऊन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ.राजेंद्रकुमार खताळ यांनी आधुनिक काळात युवा पिढीचे योगदानाबद्दल मार्गदर्शन केले.बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखेचे शाखाधिकारी हेमंत पाध्ये यांनी महात्मा गांधी यांच्या दृष्टीकोनातून युवा कार्य, कर्तव्य,बॅंक व्यवहार व विविध योजनांची माहिती दिली.यावेळी भारत बागवे व प्राचार्य डॉ.जे.के.कांबळे यांनी महात्मा गांधी यांच्या दृष्टीकोनातून आपले मार्गदर्शनपर विचार मांडले.
यावेळी महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून महाविद्यालय परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ.एन.एन.बागूल यांनी तर सुत्रसंचालन व आभार प्रा.डॉ.एन.एन.बागूल यांनी मानले.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या