कोर्लई,ता.५(राजीव नेवासेकर) मुरुड येथील रहिवासी ठाण्यातील ज्येष्ठ समाजसेवक अनिल पुलेकर यांना
सहकर्म सामाजिक कल्याण फाउंडेशन (रजि.) द्वारे आयोजित राज्यस्तरीय महाराष्ट्र गौरव पुरस्कार- 2025 ने सन्मानित करण्यात आल्याबद्दल सर्वत्र कौतुक व अभिनंदन केले जात आहे.
सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल कल्याण(पश्चिम)येथे इंडियन कॉपीराइट प्रोटेक्शन, मुंबई व सहकर्म सामाजिक कल्याण फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यात अनिल पुलेकर यांना ऑपरेशन कारगिल आणि 26/11 मध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारे सैन्य अधिकारी महेंद्र गवई ह्यांच्या हस्ते सुवर्ण पदक व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
हा पुरस्कार सामाजिक कार्यातील उत्कृष्ट योगदानासाठी दिला जात असून यामुळे समाजसेवकांच्या कार्याला प्रोत्साहन मिळते.मुरुड येथील रहिवासी अनिल पुलेकर ठाणे शहरात अनेक वर्षांपासून समाजसेवेत सक्रिय असून, विविध सामाजिक उपक्रमांतून गरजूंसाठी ते योगदान देत असतात.त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल आप्तेष्ट नातेवाईक, मित्र परिवार व चाहत्यांकडून अभिनंदन व कौतुक केले जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या