कोर्लई,ता.३०(राजीव नेवासेकर)गेली अनेक वर्षे दुरावस्थेत असलेली मुरुडच्या बाजारपेठेतील कल्याणी हॉस्पिटल समोरील निवारा शेड आज सकाळच्या वेळेत कोसळली.यावेळेत अगोदर केळघर, अलिबाग व रोह्याकडे जाणा-या एस.टी.गाड्या येथून निघून गेल्याने सुदैवाने जीवितहानी टळली ! नेहमी याठिकाणी काही प्रवासी बसलेले असायचे.
शहरातील अलिबाग, मुंबई,पुणे तसेच आजूबाजूच्या ग्रामीण भागातील प्रवाशांसाठी असलेल्या या निवारा शेडची पार दुरावस्था झाली होती,वेळोवेळी दुरुस्तीची मागणी केली जात होती.नगरपरिषद संबंधितांनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले.शहरातील काही धोकादायक दायक इमारतींना संबंधितांकडून नोटीस बजावण्यात आली मात्र दुरावस्था झालेल्या या निवारा शेडकडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष झाले असल्याची चर्चा नागरिकांमधून ऐकायला येत आहे.
नगरपरिषदेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी यात तातडीने लक्ष पुरवून याठिकाणी प्रवाशांसाठी लवकरातलवकर नवीन निवारा शेड बांधण्यात यावी.अशी मागणी प्रवासी व नागरिकांतून केली जात आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या