कोर्लई,ता.२९(राजीव नेवासेकर) मुरुड मध्ये सर्वत्र नवरात्रौत्सवाची धुम असताना चार पाच दिवसांपासून पावसाची बॅटिंग असून आज सकाळपर्यंत ४१ मि.मी.तर आतापर्यंत २५२६ मि.मी.पावसाची नोंद झाली आहे.
बंगालच्या खाडीमध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला आहे. शनिवारी पहाटेपासूनच राज्यातील काही जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरूवात झाली. अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळित झाले.
हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार रविवार दिनांक 28 सप्टेंबर रोजी रायगड जिल्ह्यासाठी रेड अलर्ट दिला असून काही ठिकाणी अतिमुसळधार ते अतिवृष्टी सदृश्य पाऊस होणार असल्याचा व पूर - दरड प्रवण भागातील नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.ऐन नवरात्रौत्सवात पडत असलेल्या पावसामुळे याचा गरबा दांडिया रास खेळणा-या भाविकांचा हिरमोड झाला असून तसेच याचा भात पिकावर परिणाम होतो कि काय?अशी शंका व्यक्त केली जात आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या