कोर्लई,ता.28(राजीव नेवासेकर)साळाव -मुरुड रस्त्यावर अनेक ठिकाणी वळणावर, रस्त्यालगत मोठ्या प्रमाणावर असलेल्या झाडाझुडुपांमुळे अनेकांना वेळप्रसंगी अपघाताला सामोरे जावे लागत असून संबंधित बांधकाम खात्याने यात तातडीने लक्ष पुरवून योग्य ती उपाययोजना करण्याची मागणी पर्यटक,प्रवासी, वाहनचालक व नागरिकांतून केली जात आहे.
मुरुडच्या परेश नाका ते राजवाडा विहूर दरम्यान वळणावरील रस्त्यालगत असलेल्या झाडाझुडपांमुळे समोरील येणारे वाहन दिसत नसल्याने अनेकांना सामोरे जावे लागत असून वेळप्रसंगी याठिकाणी अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.
नुकताच याठिकाणी वाकड्या आब्याजवळ पीकप टेम्पो व एस.टी.बसचा भीषण अपघात होऊन तेरा जण जखमी, त्यातील पाच गंभीर जखमी झाल्याची घटना ताजी आहे.
संबंधित बांधकाम खात्याने यात तातडीने दखल घेऊन,लक्ष पुरवून योग्य ती उपाययोजना करण्याची मागणी पर्यटक, प्रवासी व नागरिकांतून केली जात आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या