कोर्लई,ता.१९(राजीव नेवासेकर) मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानातून ग्रामविकासाला गती मिळेल, याबरोबरच ग्रामपंचायतीला सक्षम व स्वयंपूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.गावोगावीपायाभूत सुविधा, महिला सक्षमीकरण आणि डिजिटल सुविधा उपलब्ध करुन देऊन ग्रामविकासाला चालना मिळेल.असे प्रतिपादन मुरुड तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राजेंद्रकुमार खताळ यांनी केले.
मुरुड तालुक्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा तालुका स्तरावरील शुभारंभ करण्यात आला, याप्रसंगी ते बोलत होते. यादिवशी मुरुड तालुक्यातील 24 ग्रामपंचायतीमध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबविणे बाबत ग्रामसभा घेण्यात आल्या
तालुक्यातील नांदगाव येथे करण्यात आलेल्या कार्यक्रमात नोडेल अधिकारी तथा प्राथमिक शिक्षण अधिकारी दहीतुले मॅडम, तालुका गटविकास अधिकारी डॉ.राजेंद्रकुमार खताळ,सहाय्यक गटविकास अधिकारी मंगेश पाटील, गटशिक्षण अधिकारी सुनिल गवळी,सांख्यिकी विस्तार अधिकारी प्रसाद माळी,ग्रा.पं विस्तार अधिकारी स्वप्निल म्हात्रे, पालक अधिकारी सुनिल काळे,सरपंच सेजल घुमकर, मान्यवर ग्रामस्थ, ग्रामपंचायत अधिकारी प्रमोद म्हात्रे व शासकीय कर्मचारी हजर होते तर मजगांव ग्रामपंचायतीत प्रशासक प्रसाद माळी व मान्यवर ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होेते.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या