यावेळी तहसीलदार आदेश डफळ,पोलिस निरीक्षक परशुराम कांबळे, वसंतराव नाईक महाविद्यालय विकास समिती सदस्य डॉ.विश्वास चव्हाण, प्राचार्य डॉ.जे.के.कांबळे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.एस.एस.भैरगुंडे,प्रा.डॉ.जी.डी.मुनेश्वर, नगरपरिषद अधिकारी नंदकुमार आंबेतकर, राकेश पाटील, संजीवनी आरोग्य सेवा संस्थेचे विजय सुर्वे,प्रा.एन.एन.बागूल,डी.एल.एल.ई.विभाग प्रा.सिमा नाहीद आदी.मान्यवर उपस्थित होते.
या स्वच्छता अभियानात सागरी सीमा मंच, महाराष्ट्र मेरीटाइम बोर्ड,तहसील कार्यालय, पंचायत समिती,संजीवनी आरोग्य सेवा संस्था, मच्छीमार संघ,राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक आणि डी एल एल इ विद्यार्थी सहभागी होते.यावेळी सर्वांनी स्वच्छतेची शपथ घेतली आणि समुद्रकिनाऱ्यावरील कचरा, प्लॅस्टिक, बाटल्या दोन ट्रॅक्टर द्वारे गोळा करण्यात येऊन परेश हॉटेल ते एकदरा पूला जवळील सुमारे दीड कि.मी.समुद्रकिनारा स्वच्छ करण्यात आला.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या