कोर्लई,ता.१९(राजीव नेवासेकर)अदानी फाऊंडेशन, दिघी पोर्ट लिमिटेड यांच्या वतीने शिस्ते येथील आगरी समाज हॉलमध्ये प्रथमच भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरामध्ये मुंबई येथील नामांकित तज्ञ डॉ. वैभव पाटील (जनरल फिजिशियन),डॉ.दिशा गोपाळकृष्ण (स्त्रीरोग तज्ञ),डॉ.सुयश विरकर (त्वचारोग तज्ञ) यांनी ग्रामस्थांची तपासणी करून योग्य उपचार सेवा व मार्गदर्शन दिले तसेच वृद्ध रुग्णांच्या सांधेदुखी व गुडघेदुखी सारख्या आजारांवरही मोफत उपचार करण्यात आले.
हेल्पएज इंडिया यांच्या माध्यमातून रक्तदाब, हिमोग्लोबिन व मधुमेह तपासणी तसेच फिरता दवाखाना सेवा उपलब्ध करून देण्यात आली.या शिबिरात एकूण २६३ ग्रामस्थांनी लाभ घेतला.
“दिघी पोर्टच्या माध्यमातून गावकऱ्यांसाठी विविध आरोग्यविषयक सोयी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. याचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा व आपल्या आरोग्य समस्या दूर कराव्यात.” तसेच भविष्यात अशा उपक्रमांचे सातत्याने आयोजन केले जईल.असे अवधूत पाटील यांनी सांगितले.
आगरी समाजाचे अध्यक्ष रमेश घरत यांनी सर्व लोकांना या शिबिराच्या माध्यमातून लाभ कसा घेता येईल व आगामी काळात अदानी फाउंडेशन दिघी पोर्ट लिमिटेड तर्फे विविध उपक्रमांचा गोरगरीब जनतेने लाभ घ्यावा.असे आवाहन केले.
या उपक्रमासाठी ग्रामपंचायत शिस्ते यांचे विशेष सहकार्य लाभले. शिबिराच्या आयोजनासाठी ग्रामसखी अरुंधती पिळणकर, प्राजक्ता आडुळकर व नम्रता दिघीकर यांनी विशेष परिश्रम घेतले.यावेळी हेल्पएज इंडिया यांच्या प्रमुख अधिकारी सिद्धाली नागवेकर, डॉक्टर सिद्धेश शिंदे, फार्मसिस्ट तनिषा भायदे व निलेश पाटील उपस्थित होते. माणगाव येथील नितीन चांदोरकर व त्यांच्या टीमकडून औषधोपचाराची सुविधा देण्यात आली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अखंड आगरी अध्यक्ष रमेश घरत, उपाध्यक्ष संतोष पाटील, सचिव दिपेश नाकती, खजिनदार दशरथ धुमाळ, सल्लागार प्रकाश कांबळे, माजी सरपंच चंद्रकांत चाळके, गजानन चाळके, माजी अध्यक्ष नाना मोहिते, संतोष भायदे, प्रमोद नाकती, सखाराम पाटील, गाव पाटील जनार्दन भायदे, महिला अध्यक्ष वैजयंती चाळके, सचिव सुनिता चाळके, खजिनदार ज्योती भायदे, अखंड आगरी समाज शिस्ते समाजबांधव व महिला मंडळ तसेच मुख्याध्यापक पानवलकर गुरुजी व ग्रामपंचायत शिस्ते यांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन परशुराम बिराडी यांनी केले.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या