Type Here to Get Search Results !

नांदगावच्या आयुष्य हॉस्पिटलमध्ये सोनोग्राफी सुविधा शुभारंभ

 कोर्लई,ता.१७(राजीव नेवासेकर)ॲल्टस गुड हेल्थ प्रायव्हेट लिमिटेड संचलित मुरुड तालुक्यातील नांदगाव येथील आयुष्य हॉस्पिटलमध्ये सोनोग्राफी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली असून या सेवेचा तालुक्यातील तसेच आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी लाभ घ्यावा.असे आवाहन आयुष्य हॉस्पिटलच्या संचालिका डॉ.नूतन माळी व डॉ.स्नेहा माळी -फासे यांनी केले आहे.

    नांदगाव मजगांव पंचक्रोशीतील रुग्णांना आवश्यक अशा सोनोग्राफी साठी यापूर्वी अलिबाग,पेण, मुंबई येथे जावे लागत होते.याठिकाणी सोनोग्राफी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्याने गरोदर माता, हृदय २ डी e CHO पोटाची व किडणी तपासणी करण्यात येऊन अत्यल्प दरात आधुनिक उपचार करण्यात येणार आहेत.

   यावेळी आयुष्य हॉस्पिटलच्या संचालिका डॉ.नूतन माळी, डॉ.स्नेहा माळी -फासे, रामलिंग माळी, हृदयरोग तज्ञ डॉ.शिवशरण भारत, डॉ.राजेंद्र शितोळे उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

फॉलोअर