कोर्लई,ता.१६(राजीव नेवासेकर)अदानी फाउंडेशन दिघी पोर्ट लिमिटेड यांच्यातर्फे मुरुड तालुक्यातील राजपूरी ग्रामपंचायतीच्या सहकार्याने रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत मराठी शाळेत मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरामध्ये मुंबई येथील नामांकित तज्ञ डॉक्टरांनी ग्रामस्थांची तपासणी करून योग्य उपचार सेवा व मार्गदर्शन दिले. त्यामध्ये –
या शिबिरात तज्ञ डॉ.करनकुमार वाघमारे (जनरल फिजिशियन),डॉ. दिशा गोपाळकृष्ण (स्त्रीरोग तज्ञ),
डॉ.सुयश विरकर (त्वचारोग तज्ञ) यांनी उपस्थित ग्रामस्थांना आरोग्यविषयक महत्वपूर्ण माहिती देऊन मोफत तपासणी आणि उपचार केले तसेच वृद्ध रुग्णांच्या त्वचारोग, सांधेदुखी व गुडघेदुखी सारख्या आजारांवरही मोफत उपचार करण्यात आले.याचा ग्रामस्थांनी लाभ घेतला.
यावेळी हेल्पएज इंडिया यांच्या माध्यमातून रक्तदाब, हिमोग्लोबिन व मधुमेह तपासणी तसेच फिरता दवाखाना सेवा उपलब्ध करून देण्यात आली.
अदानी फाउंडेशनचे अवधूत पाटील यांनी या प्रसंगी सांगितले की, “दिघी पोर्टच्या माध्यमातून गावकऱ्यांसाठी विविध आरोग्यविषयक सोयी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. याचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा व आपल्या आरोग्य समस्या दूर कराव्यात.” तसेच भविष्यात अशा उपक्रमांचे सातत्याने आयोजन केले जाईल, असेही त्यांनी नमूद केले.
हेल्पएज इंडिया यांच्या प्रमुख अधिकारी सिद्धाली नागवेकर, डॉक्टर सिद्धेश शिंदे, फार्मसिस्ट तनिषा भायदे व निलेश पाटील उपस्थित होते. हेल्पएज इंडिया यांच्या वतीने मोफत तपासणी व औषधोपचाराची सुविधा देण्यात आली.शिबिराच्या आयोजनासाठी मराठी शाळा व कोळी समाज बांधवांचे सहकार्य लाभले तर ग्रामसखी प्राजक्ता आडुळकर, अरुंधती पिळणकर यांनी विशेष परिश्रम घेतले. राजपुरी ग्रामपंचायत सरपंच सुप्रिया गिद्दी यांनी नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल आभार व्यक्त केले.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या