कोर्लई,ता.१७(राजीव नेवासेकर) मुरुड मधील सुसंस्कृती महिला समिती ही एक शाळेत कार्यरत असलेल्या व सेवानिवृत्त झालेल्या शिक्षिकांची सुसंस्कृती नावाने कार्यरत असून नैनिता कर्णिक यांच्या निवासस्थानी भिस्सीच्या सभेचे औचित्य साधून जुईली संजय गुंजाळ हिला अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चित्रपट सांस्कृतिक विभाग महाराष्ट्र प्रदेश आयोजित राज्यस्तरीय शाॅर्ट फिल्म डॉकी मेट्री साठी व्हय मी सावित्रीची लेक या चित्रपटाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाल्याबद्दृल तसेच नगरपरिषद शिक्षण समिती मुरूड जंजिरा शाळा नं २ मधील सहशिक्षिका सायली गुंजाळ यांना आमदार महेंद्रशेठ दळवी आमदार पुरस्कृत २०२५चा गुणवंत शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल ज्येष्ठ मुख्याध्यापिका वैशाली कासार, सुजाता जंजिरकर,अनघाचौलकर ज्येष्ठ शिक्षिका आशालता बाक्कर,रोहिणी मसाला, मनिषा फाटक, निलांबरी भगत,मंगल मुनेकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नगरपरिषद शिक्षण समिती मुरूड शाळा नं ४ च्या मुख्याध्यापिका राजश्री गजने, जिल्हा परिषद शिक्षिका सुवर्णा भोईर यांनी विशेष परिश्रम घेतले तर सेवानिवृत्त मुख्याध्यापिका नैनिता कर्णिक यांनी आभार मानले.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या