कोर्लई,ता.१७(राजीव नेवासेकर)कोकण उन्नती मित्र मंडळ संचलित मुरुडच्या वसंतराव नाईक कला व वाणिज्य महाविद्यालयात प्राचार्य डॉ.जे.के.कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली व अध्यक्षतेखाली हिंदी विभागातर्फे हिंदी दिवस साजरा करण्यात आला.
यावेळी महाविद्यालय विकास समिती सदस्य विश्वास चव्हाण, प्रमुख अतिथी पत्रकार जाहीद फकजी,प्राचार्य डॉ.जे.के.कांबळे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.एस.एस.भैरगुंडे,प्रा.डॉ.जी.डी.मुनेश्वर,प्रा.डॉ.एन.एन.बागूल,प्रा.डॉ.सिमा नाहीद,प्रा.चिंतन पोतदार,प्रा.मुस्कान रज्जाब,डॉ म्हात्रे, प्रा.प्रणव बागवे प्रा सिध्देश सतविडकर,प्रा.प्रवेश पाटील,प्रा.रुफी हसवारे उपस्थित होते.
सुरुवातीला सर्व उपस्थितांचे स्वागत करण्यात येऊन ईशस्तवनाने कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
हिंदी भाषेला 14 सप्टेंबर 1949 रोजी संविधान सभेने राज भाषेचा दर्जा दिला गेला कारण हिंदी भाषा राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक आणि संपर्क भाषा म्हणून आज आपल्या देशामध्ये बोलली जाते आपल्या देशात मध्ये एकूण लोकसंख्येच्या 60 करोड जनता हिंदी भाषेच्या माध्यमातून आपले विचार प्रकट करत असते.असे डॉ बागुल यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले. याप्रसंगी काव्यवाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते हिंदी विभागातील विद्यार्थ्यांनी आपल्या कविता सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढवली तसेच काही विद्यार्थ्यांनी हिंदी भाषेविषयी आपले मनोगत व्यक्त केले
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी पत्रकार जाहिद फकजी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करुन शिक्षणाबरोबरच आपण समाजकार्य सुद्धा केले पाहिजे आपल्या समाजामध्ये जे गरजू आहेत त्यांना आपण मदत केली पाहिजे तरच आपल्या शिक्षणाचा समाजाला योग्य उपयोग होईल.असे मार्गदर्शन करताना सांगितले.महाविद्यालय विकास समितीचे सदस्य डॉ .विश्वास चव्हाण, प्राचार्य डॉ.जे.के.कांबळे आणि संयोजक डॉ एन बागुल यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी प्रा. डॉ.सीमा नाहीद प्रा चिंतन पोद्दार आणि प्रा मुस्कान रज्जब यांनी स्पर्धेचे आयोजन करून परीक्षण केले होते. यामध्ये अरफात सिरसीकर प्रथम, अंतरा मसाला द्वितीय, रीदा किल्लेकर आणि अल्मिरा घारे तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले तसेच काव्यवाचन स्पर्धेमध्ये राज पवार प्रथम, फिजा जामदार द्वितीय,अरफात शिरसीकर तृतीय, आणि अंतरा मसाल उत्तेजनार्थ क्रमांकाचे मानकरी ठरले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी अल्मिरा घारे यांनी केले तर कु.अंतरा मसाल हिने आभार मानले.
________________________________________
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या