कोर्लई,ता.२७(राजीव नेवासेकर) मुरुड -साळाव रस्त्यावर नबाबाचा राजवाडा ते विहूर दरम्यान मुरुड आगाराची अलिबाग -मुरुड व पीकअप टेम्पो यांच्यात दुपारच्या वेळेत भीषण अपघात झाला.या अपघातात १२ जण जखमी झाले असून त्यातील ५ जण गंभीर झाले असून जखमींना पुढील उपचारासाठी अलिबाग येथे जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
याबाबत असे कळते कि, मुरुड तालुक्यातील मजगांव येथील पीकअप टेम्पो काही महिलांना मुरुडच्या कोटेश्वरी मंदिरात देवीचे दर्शन घेऊन परतत असताना नबाबाचा राजवाडा ते विहूर दरम्यान वाकड्या आब्याजवळ मुरुड आगाराच्या अलिबाग -मुरुड येणाऱ्या एस.टी.चा व टेम्पोचा जोरदार धडक लागून भीषण अपघात झाला.या अपघातात टेम्पोचा चालक जय इंद्रजित करंदीकर,अलका मुंबईकर, जीवन गोयजी, रेखा भगत (थेरोंडा)गंभीर जखमी झाले असून निरजला जगू, मनीषा मुंबईकर,ओवी पोवळे, वैशाली तबीब, सविता कारभारी (रोहा-अष्टमी), कल्याणी करंदीकर जखमी झाले असून या सर्वांना अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलविण्यात आले असल्याचे समजते.
अपघाताचे वृत्त समजताच तहसीलदार आदेश डफळ, पोलिस निरीक्षक परशुराम कांबळे व आगार प्रमुख राहुल शिंदे घटना स्थळी दाखल झाले.जखमींना तातडीने मुरुड ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी अलिबाग जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.
सदर अपघाताचा तपास पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार दिनेश गायकवाड हे करीत आहेत.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या