Type Here to Get Search Results !

ललित पंचमी दिवशी श्री स्वामी समर्थ आदिमाया शक्ती रुपात *मुरुड डोंगरीसुभा श्रीस्वामी समर्थ मठात दर्शनासाठी गर्दी ललित पंचमी दिवशी श्री स्वामी समर्थ आदिमाया शक्ती रुपात *मुरुड डोंगरीसुभा श्रीस्वामी समर्थ मठात दर्शनासाठी गर्दी

कोर्लई,ता.२६ (राजीव नेवासेकर) नवरात्रौत्सवात मुरुड तालुक्यातील डोंगरी सुभा गावामधील श्रीस्वामी समर्थ मठामध्ये ललित पंचमीच्या दिवशी श्री स्वामी महाराजांना हिरवी साडी परिधान करून आदिमाया शक्ती रुप साकारण्यात आले आहे. या रूपातील दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.

        ललित पंचमीच्या दिवशी पहाटेपासूनच श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीला विधीवत अभिषेक पूजा अर्ज करून श्री स्वामी समर्थ महाराजांना हिरवी साडी परिधान केली. त्यानंतर आरती करून आलेल्या भाविकांना दर्शनाचा व प्रसादाचा लाभ देण्यात आला. या निमित्ताने शेकडो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला.

        डोंगरी सुभा गावातील मठामध्ये मठाधिपती गुरुमाऊली त्रिशा दत्तात्रेय पाटील ही सेवा देत असतात. त्यांच्यातर्फे अन्नछत्र देखील चालविले जाते. यासाठी येणाऱ्या भक्तांकडून कोणत्याही स्वरूपाची देणगी स्वीकारले जात नाही. या मठातील सर्व कार्यक्रम श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादाने चालविले जातात व येणाऱ्या दिन दुबल्या त्रस्त भाविकांच्या समस्या महाराजांच्या आशीर्वादाने सोडविल्या जातात. ज्यांची महाराजांवर दृढ श्रद्धा आणि निष्ठा असेल अशा भक्तांना निश्चितच समाधान प्राप्त होतो. अशी प्रतिक्रिया या मठाच्या अधिपती त्रिशाताई पाटील यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

फॉलोअर