Type Here to Get Search Results !

आपले घर परिसर स्वच्छ ठेवल्यास आरोग्याची आपत्ती येणार नाही-प्रा.डॉ.जयपाल पाटील


कोर्लई,ता.२२(राजीव नेवासेकर)आपण घरांमधून  कामानिमित्त,अभ्यासासाठी,गर्दीच्या ठिकाणी बाजारात जाण्याची वेळआपणा सर्वांवर कायम येत असते,बाहेरच्या वातावरणात हवेमधे धुळीकणा बरोबर सुक्ष्म जंतुचा सहवास होऊन आपणास  वेगवेगळे रोगाचा प्रादुर्भाव म्हणजेच आपत्ती येते या साठी कायम घरात आल्यावर संपुर्ण चेहरा,हात पाय साबणाने स्वच्छ करण्याची सवय लावून घ्या व आपले घर,परिसर प्रत्त्येकाने स्वच्छतेची कास धरावी.असे आपत्ती व्यवस्थापन तज्ञ तथा रायगड भूषण प्रा.डॉ.जयपाल पाटील यांनी अलिबाग तालुक्यातील बामणगाव ग्रामपंचायतीने आयोजित केलेल्या आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळेत मार्गदर्शन करताना सांगितले.

     यावेळी रायगड भूषण प्रा.डॉ.जयपाल,संजय  ठाकुर,आपत्ती सुरक्षा मित्र सुरेश खडपे,डॉ.जयप्रकाश  पांडे,रूपाली भगत,आशाताई ऊपस्थित होत्या

     .यावेळेस महिलांच्या सुरक्षेसाठी 112 क्रमांक, महिलांना  बाळंतपणात महाराष्ट्र शासन आरोग्य खात्याची 102रुगणवाहिकेचा वापर, साप,विंचु दंश व अपघात झाल्यास 108क्रमांकचे प्रात्यक्षिक देताना 108चे उपजिल्हाप्रमुख अजय जगताप यांनी 108पायलट धर्मा झेंडे येताच तीचा मोफत वापरा बाबत माहिती डॉ.जयप्रकाश पांडे यांनी दिली,महिलांना,घरातील गॅस सिलेंडर,फ्रिज,यांचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.पाहुण्यांचे स्वागत शाल,श्रीफळ व वृक्ष देऊन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक शशिकांत मानकर यांनी केले तर आभार  आशाताई रूपाली भगत यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

फॉलोअर