Type Here to Get Search Results !

स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानांतर्गत मुरुडच्या ग्रामीण रुग्णालयात आरोग्य शिबीर


कोर्लई,ता.२३(राजीव नेवासेकर)शासनाच्या आरोग्य विभागामार्फत स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानांतर्गत मुरुडच्या ग्रामीण रुग्णालयाच्या शहरातील लेडिकुलसूम बेगम हॉस्पिटलमध्ये  माजी नगराध्यक्षा स्नेहा पाटील यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले.

       नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष मंगेश दांडेकर,माजी नगराध्यक्षा स्नेहा पाटील,संजीवनी आरोग्य सेवा संस्थेचे विजय सुर्वे, श्रीकांत सुर्वे, वैद्यकीय अधिक्षक डॉ.उषा चोले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.पायल राठोड,मनीष माळी, वैद्यकीय अधिकारी, सर्व अधिकारी,कर्मचारी वृंद यावेळी उपस्थित होते.

 सुरुवातीला वैद्यकीय अधिक्षक डॉ.उषा चोले सर्व उपस्थितांचे स्वागत करण्यात येऊन धन्वंतरी देवीला पुष्पहार अर्पण करून दिपप्रज्वलननाने शिबीराला सुरुवात करण्यात आली.

     या आरोग्य शिबीरात मुख्यमंत्री सचिवालय अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या नमो नेत्र संजीवनी आरोग्य अभियान घेण्यात येऊन रुग्णांची तपासणी करण्यात आली.यावेळी स्रिरोग तज्ञ डॉ.मंगेश पाटील, बालरोग तज्ञ डॉ. मेघराज दावे, नेत्र चिकित्सक अधि.डॉ. अजय इंगळे,नाक -कान-घसा तज्ञ डॉ.हर्ष गुजराथी, दंत चिकित्सक डॉ. शेखर वानखेडे, त्वचा रोग तज्ञ डॉ. हेतल गांधी दर्शनी, मानसोपचारतज्ज्ञ डॉ. कीस्तुक ससाने,फिजिशिशीयन डॉ. निधी लाहोटी, अस्थिरोग तज्ञ डॉ. कोस्तूक दास आदी .तज्ञ डॉक्टरांनी शहरातील व आजुबाजूच्या परिसरातील महिलांची रक्तदाब, मधुमेह, नेत्र, दंत रोग,स्तन व गर्भाशय मुख व मुख कर्करोग,गरोदर महिलांसाठी प्रसूतीपूर्व तपासणी केली तसेच लसीकरण सेवा, रक्त व हिमोग्लोबिन,क्षयरोग,सिकसेल आजार व रक्तक्षय तपासणी करण्यात आली.यावेळी विशेष तज्ञांचा सल्ला व मार्गदर्शन तसेच विविध योजनांची माहिती देण्यात आली.सुत्रसंचालन अमोल रणदिवे यांनी तर विठ्ठल शिंदे यांनी आभार मानले. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

फॉलोअर