कोर्लई,ता.२२(राजीव नेवासेकर)गेल्या दोन तीन महिन्यांपासून मुरुडच्या तहसीलदार व रजिस्ट्रार कार्यालय परीसरात वाढलेले गवत, कचरा व घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे विविध कामानिमित्त या ठिकाणी येणारे नागरिक व संबंधित अधिकारी वर्गाच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या ठिकाणी शहरासह तालुक्यातून आपल्या विविध कामांसाठी ये-जा करणाऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर वावर असतो.
कार्यालयाच्या जवळपास शौचालय व प्रसाधनगृह आहे. पावसाळा सुरु होऊन दोन महिने होताच या परीसरात गवत आणि घाणीचे साम्राज्य पसरले आहे. कार्यालयांच्या मागील बाजूस झाडी-झुडपे वाढली असल्याने सरपटणाऱ्या विषारी प्राण्यांचा धोका देखील उद्भवला आहे. त्यामुळे शासनाच्या संबंधित अधिकारी वर्गाने यात तातडीने लक्ष पुरवून योग्य ती उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या