कोर्लई,ता.२१(राजीव नेवासेकर) शासनाचा सेवा पंधरवडा कार्यक्रम म्हणजे विकासाचे शिखर गाठण्याची सुवर्णसंधी असून सर्वांनी या मोहिमेत सहभागी होऊन एकजुटीचे सुत्र अंमलात आणावे, गावाच्या विकासासाठी हे अभियान मार्गदर्शक ठरणार असल्याचे प्रतिपादन तहसीलदार आदेश डफळ यांनी नांदगाव मध्ये सेवा पंधरवडा कार्यक्रमाप्रसंगी केले.
छत्रपती श्री शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसी दि.१७ सप्टेंबर ते महात्मा गांधी जयंती दि.२ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत सर्वत्र सेवा पंधरवडा साजरा करण्यात येत असून दि.१७ सप्टेंबर रोजी तालुक्यातील २४ ग्रामपंचायतीत ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते.
रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण व दुर्गा देवरे यांच्या उपस्थितीत तहसीलदार आदेश डफळ यांनी सेवा पंधरवडा अंतर्गत पहिल्या टप्प्यातील पाणंद रस्ते मोहिमेअंतर्गत माहिती नांदगाव येथील ग्रामसभेत दिली.
नांदगाव येथे ग्रामस्थ, शेतकरी बांधवांसमवेत शिवारफेरी काढण्यात आली होती.शासनाने सेवा पंधरवड्यात ठरवून दिलेल्या तीन टप्प्यांची पाणंद रस्ते, सर्वांसाठी घरे व इतर नाविन्यपूर्ण उपक्रमांची सविस्तर माहिती यावेळी देण्यात आली.या शिबीरात वांदेली,दांडे तर्फे नांदगाव व मुरुड गावाचे नकाशावर असलेल्या व नसलेल्या रस्त्यांच्या यादीचे वाचन मंडळ अधिकारी मंगेश इग्रुळकर यांनी केले.पंचक्रोशितील सरपंच, उपसरपंच, सदस्य,ग्रामस्थ व शेतकरी बांधव यावेळी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या