कोर्लई,ता.१४(राजीव नेवासेकर) मुरुडमध्ये रस्त्यावर असलेली उनाड गुरे, त्यामुळे रस्त्यावर पडणारा शेणसडा,भटकी कुत्री -घोडे आदी.विविध समस्यांनी नागरिक त्रस्त झालेले असताना त्यात भरीस भर म्हणून गेल्या महिनाभरापासून होत असलेला गढूळ पाणी पुरवठा यामुळे विविध प्रकारच्या दुखण्यांनी अनेक जण बेजार झाले असून गढूळ पाणी पुरवठा करुन नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्या-या नगरपरिषदेच्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात सामाजिक कार्यकर्ते पुढाकार घेणार असल्याचे बोलले जात आहे.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरासाठी असलेली जलशुद्धीकरण यंत्रणा सुस्थितीत,व्यवस्थित ठेवणे जबाबदारी नगरपरिषदेची होती.गढूळ पाणी पुरवठा प्रश्नी स्थानिक लोकप्रतिनिधींनीही लक्ष दणे गरजेचे होते.असे बोलले जात आहे.
मुरुड मधील जिव्हाळ्याच्या प्रश्नावर नगरपरिषद मुख्याधिकारी तथा प्रशासक यांच्या दालनात मुरुड संघर्ष समितीच्यावतीने नुकतीच एक बैठक घेण्यात येऊन शहरातील विविध मच्छी मार्केट,भाजी मार्केट वाहतूक (ट्रॅफिक) समस्या, कचरा समस्या ह्या मुद्दयांवर पण सविस्तर चर्चा करण्यात आली.पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरासाठी असलेली जलशुद्धीकरण यंत्रणा सुस्थितीत,व्यवस्थित ठेवणे जबाबदारी नगरपरिषदेची होती.नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्या दालनात झालेल्या बैठकीत विविध प्रकारच्या समस्यांवर चर्चा करण्यात आली.चर्चेची फलश्रुती समस्यांवर तोडगा काढण्यात येणार असला आणि आता शुद्ध पाणी पुरवठा करण्यात आला तरी नगरपरिषद पाणी पट्टी घेऊन जबाबदारी असताना देखील महिनाभर गढूळ पाणी पुरवठा करण्यात येऊन नागरिकांच्या आरोग्याशी खेळ खेळला गेला त्याच काय ? आणि याला जबाबदार असणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात सामाजिक कार्यकर्ते पुढाकार घेऊन दाद मागणार असल्याचे बोलले जात आहे.नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांच्याकडे अलिबाग नगरपरिषदेचा अतिरिक्त कार्यभार सांभाळत असल्याने, मुख्य नियुक्ती कडे त्यांचे दुर्लक्ष तर होत नाही ना ? असा सवाल विचारला जात आहे तसेच मुरुडच्या विविध प्रश्नी काही सामाजिक कार्यकर्ते तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याच्या तयारीत असल्याचे समजते.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या