कोर्लई,ता.७(राजीव नेवासेकर) मुरुड तालुक्यातील नांदगांव येथील तालुका पंचायत समितीच्या माजी सभापती स्मिता खेडेकर यांनी सामाजिक बांधिलकीच्या नात्याने सर्व प्रमुख महिलांना संघटित करून सखी मंच या ग्रुपची स्थापना केली. पवित्र अशा श्रावण महिन्याचे औचित्य साधून अमृतेश्वराच्या सभामंडपात महिलांच्या भजनाने सरखी मंच ग्रुप सक्रिय केला. याप्रसंगी महिला मोठ्या संख्येने व उत्साहाने सामिल झाल्या होत्या.
ग्रुप स्थापनेचा उद्देश स्पष्ट करताना स्मिता खेडेकर म्हणाल्या कि, महिलांचा फावला वेळ सत्कारणी लागावा, त्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा तसेच सामाजिक बांधिलकी जपली जावी आणि विशेष म्हणजे आपल्या जिवनाचा निरवळ आनंद लुटता यावा. या अनोख्या आणि व वैशिष्ट्यपुर्ण हतुने हा मंच स्थापन करण्यात आला आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने हा ग्रुप निश्चितच नावारूपाला येईल. अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी सेवानिवृत्त शिक्षिका सुगंधा दळवी व त्यांच्या सहकारी महिलांनी सुश्राव्य भजनाचा कार्यक्रम सादर केला. कल्पेश मळेकर, सुरेश दळवी, उदय रणदिवे यांनी त्यांना पेटी, टाळ मृदंगावर साथ दिली.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या