कोर्लई,ता.४(राजीव नेवासेकर)महाराष्ट्र शासन,सार्वजनिक आरोग्य विभाग,जिल्हा सामान्य रुग्णालय रायगड-अलिबाग व मुख्यमंत्री सहाय्यता निधी धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय,रायगड-अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने मुरुड ग्रामीण रुग्णालयाच्या शहरातील लेडी कुलसुम बेगम हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय अधिक्षक उषा चोले यांच्या मार्गदर्शनाखाली व उपस्थितीत अस्थिव्यंग,नेत्र विकार व मानसिक आजार याबाबत
दिव्यांग तपासणी व प्रमाणपत्र वाटप शिबीर संपन्न झाले.
यावेळी जिल्हा रुग्णालय अलिबाग येथील डॉ. अशिष मिश्रा अस्थिव्यंग तज्ञ, डॉ. केतकी पाठक, भौतिकोपचार तज्ञ, डॉ. प्रफुल्ल धुमाळ वैद्यकिय अधिकारी, डॉ. अजय इंगळे नेत्ररोग तज्ञ, डॉ. अर्चना सिंग मानसोपचार तज्ञ राजेश पवार मानसशास्त्रज्ञ तसेच मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे सदस्य विठ्ठल शिंदे व प्रतिमा फडतरे, समाजसेवा अधिक्षक उपस्थित होते.
या शिबिरात एकूण ७६ दिव्यांग लाभार्थींनी नोंदणी केली असून १९ लाभार्थींना प्रमाणपत्र वाटप व ०७ लाभार्थींना पुढिल तपासणीकरीता अलिबाग जिल्हा रुग्णालय येथे संदर्भित करण्यात आले.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या