Type Here to Get Search Results !

मुरुड तालुक्यात महसूल सप्ताह निमित्ताने ठिकठिकाणी विशेष शिबिर संपन्न

कोर्लई,ता.४(राजीव नेवासेकर)शासनाच्या महसूल विभागामार्फत संपूर्ण राज्यात १ ऑगस्ट २०२५ रोजी "महसूल दिन" व १ ते ७ ऑगस्ट २०२५ या कालावधीत "महसूल सप्ताह-२०२५" साजरा करण्यात येत असून त्याचाच भाग जिल्हाधिकारी,प्रांताधिकारी,मुरुड तहसीलदार आदेश डफळ यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान” तालुक्यातील मंडळनिहाय राबविणे या कार्यक्रमानूसार आज दिनांक 4 ऑगस्ट 2025 रोजी मुरुड मंडळातील शिबीराचे आयोजन दरबार हॉल मुरुड येथे, नांदगाव मंडळातील शिबीराचे आयोजन पंचक्रोशी आगरी समाज सभागृह यशवंतनगर,नांदगाव येथे आणि बोर्ली मंडळातील शिबीराचे आयोजन ग्रुपग्रामपंचायत कार्यालय भोईघर या ठिकाणी आयोजित करण्यांत आले होते. 

 मुरुड येथील शिबीरामध्ये समाजातील सर्व घटकांना आवश्यकतेनूसार उत्पन्न दाखला, अधिवास दाखला, जात प्रमाणपत्र, तसेच उप अधिक्षक भूमी अभिलेख मुरुड यांचेकडील सनद यांचे वितरण तहसिलदार आदेश डफळ यांच्याहस्ते करण्यांत आले. 

  नांदगाव येथील शिबीरामध्ये समाजातील सर्व घटकांना आवश्यकतेनूसार उत्पन्न दाखला, अधिवास दाखला, जात प्रमाणपत्र, यांचे वितरण महसूल नायब तहसिलदार राजश्री साळवी यांच्याहस्ते करण्यांत आले. 

 भोईघर येथील शिबीरामध्ये समाजातील सर्व घटकांना आवश्यकतेनूसार उत्पन्न दाखला, अधिवास दाखला, जात प्रमाणपत्र, यांचे वितरण निवडणूक नायब तहसिलदार कल्याण देऊळगावकर यांच्याहस्ते करण्यांत आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

फॉलोअर