कोर्लई,ता.४(राजीव नेवासेकर) मुरुडच्या वसंतराव नाईक महाविद्यालयात प्राचार्य डॉ.जे.के.कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना व आजीवन शिक्षण विस्तार विभाग (डी.एल.एल.ई.) यांच्या संयुक्तविद्यमाने मुंबई येथील जीवन उर्जा फाऊंडेशनचे क्रांती चव्हाण यांचे आयुर्वेद व आरोग्य विषयक व्याख्यान झाले.
आरोग्याला पोषक अशा शतावरी,अश्वगंधा,मुळेठी,मधुपत्र गोखरु,आवळा यांचे आयुर्वेदातील महत्व व रोग प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी कोणत्या वनस्पती फायदेशीर आहेत.याबाबत क्रांती चव्हाण यांनी मार्गदर्शनपर व्याख्यानातून माहिती देताना सांगितले.
वसंतराव नाईक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जे.के.कांबळे, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.एस.एस.भैरगुंडे,प्रा.डॉ.जी.डी.मुनेश्वर,डी.एल.एल.ई.प्रमुख डॉ.सिमा नाहीद,प्रा.मुस्कान रज्जब यावेळी उपस्थित होते.सुत्रसंचालन प्रा.डॉ.एस.एस.भैरगुंडे यांनी तर प्रा.डॉ.सिमा नाहीद यांनी आभार मानले.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या