कोर्लई,ता.३(राजीव नेवासेकर) अलिबाग तालुक्यातील सडकोली येथील सुर्योदय हायस्कूल मधील ६६ विद्यार्थ्यांना लायन्स क्लब ऑफ न्यू पनवेल स्टील टाऊन यांच्यातर्फे प्रेसिडेंट लायन संगीता म्हात्रे एमजीएफ रमाकांत म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली लायन नितीन खोत यांच्या माध्यमातून वह्या, दफ्तर शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक तांबडकर बाबा, डॉ.संदीप वारगे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील, निवृत्त शिक्षिका कविता खोत, राजाराम माळी, प्रभाकर पाटील, भास्कर वावेकर, काशिनाथ म्हात्रे, अध्यक्ष पृथ्वीराज पाटील, सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापिका शोभना म्हात्रे, शिक्षकवृंद, ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.
"शिक्षक म्हणजे केवळ ज्ञान देणारे नसतात, ते विद्यार्थ्यांचे भविष्य घडवतात.कविता खोत यांनी आपल्या सेवाकाळात शेकडो विद्यार्थ्यांना घडवले असून त्यांच्या प्रेरणेतून आज अनेकजण डॉक्टर, इंजिनिअर, शिक्षक, अधिकारी, उद्योजक निर्माण झाले असल्याचे डॉ.सदीप वारगे यांनी सांगितले. मुख्याध्यापिका शोभना म्हात्रे यांनी कार्यक्रमाचे उत्तम प्रकारे आयोजन केले तर सूत्रसंचालन चौधरी यांनी केले.
________________________________________
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या