कोर्लई,ता.८(राजीव नेवासेकर) मुरुड तालुक्यातील मजगांव ग्रामपंचायत हद्दीतील मजगांव -वेळास्ते रस्त्याची खाच खळगे व खड्ड्यांमुळे पार दुरावस्था झाली असून आगामी येणाऱ्या गोकुळाष्टमी, गणपती सणांच्या पार्श्वभूमीवर संबंधित बांधकाम खात्याने याची तातडीने दखल घेऊन योग्य ती उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांच्यावतीने रामकृष्ण अंबाजी यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
अलिबाग -मुरुड मतदार संघाचे आमदार महेंद्रशेठ दळवी,तहसीलदार व ग्रामपंचायत मजगांव यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, येथील मजगांव - वेळास्ते जोड रस्त्याची कामे नुकतीच करण्यात आली,यात नवीआळी रस्त्यावर पावसाळ्यात पडलेले खाच खळगे व खड्डे पाहाता काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे दिसून येते आहे.यामुळे ग्रामस्थ, ज्येष्ठ नागरिक, महिला, शालेय विद्यार्थी तसेच वाहनचालकांना त्रास व हाल सहन करावा लागत आहे.
आगामी येणाऱ्या गोकुळाष्टमी व गणेशोत्सव सणांच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत व संबंधित बांधकाम खात्याने यात तातडीने लक्ष पुरवून योग्य ती उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांच्यावतीने रामकृष्ण अंबाजी यांनी निवेदनाद्वारे करण्यात आली असून सदर निवेदनाच्या प्रती खासदार सुनील तटकरे,अलिबाग -मुरुड मतदार संघाचे आमदार महेंद्रशेठ दळवी, तहसीलदार, गटविकास अधिकारी व मजगांव ग्रामपंचायतीला देण्यात आल्या आहेत.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या