Type Here to Get Search Results !

कोर्लई समुद्रकिनारी आढळला ब्राऊन बुबी (सुला ल्युको गस्टर) पक्षी


कोर्लई,ता.७(राजीव नेवासेकर) मुरुड तालुक्यातील कोर्लई समुद्रकिनारी सकाळच्या वेळेत ग्रामस्थ नितेश पाटील यांना ब्राऊन बुबी सुला ल्युको गस्टर पक्षी आढळून आला.त्यांनी अलिबाग कांदळवन वनविभागाचे वनरक्षक अनिल बोडखे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी तातडीने कोर्लई येथे येऊन पक्षाची पाहणी करून रितसर पंचनामा करण्यात आला आहे.

   पावसाळा समुद्राला उधाण भरती हवामान बदलन यामुळे हा पक्षी पोहताना दम लागल्याने किनारी येऊन थकलेल्या अवस्थेत समुद्रकिनारी बसलेला आढळून आला.

    तपकिरी बुबी (सुला ल्युकोगास्टर)बूबी हा सुलिडे कुटुंबातील एक मोठा समुद्री पक्षी आहे, ज्यापैकी तो कदाचित सर्वात सामान्य आणि व्यापक प्रजाती आहे.  त्याची एक पॅन्ट्रॉपिकल रेंज आहे, जी इतर बूबी प्रजातींशी ओव्हरलॅप होते. मिलनसार तपकिरी बूबीज किनाऱ्यावरील पाण्यात कमी उंचीवर फिरतात आणि चारा शोधतात. कळप लहान मासे पकडण्यासाठी डुबकी मारतात, विशेषतः जेव्हा त्यांना भक्षक पृष्ठभागाजवळ हाकलतात. ते फक्त जमिनीवर घरटे बांधतात आणि पाण्याच्या पृष्ठभागावर नसलेल्या घन वस्तूंवर राहतात.

   अलिबाग येथील कांदळवन वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी पाटकर व वनपाल संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक अनिल बोडखे यांनी यांनी सदर पक्षाची पाहणी करून रितसर पंचनामा केला आणि पक्षास ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

फॉलोअर