Type Here to Get Search Results !

अलिबागमध्ये आभा कार्ड आणि आयुष्मान भारत कार्ड वाटप : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचा उपक्रम

कोर्लई,ता.२१(राजीव नेवासेकर)अलिबागमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)गट शहर प्रमुख संदीप पालकर यांच्यातर्फे गेल्या तीन दिवसांपासून एस.टी.स्टॅंड जवळ मोफत आभा कार्ड व आयुष्मान भारत कार्ड वाटप कार्यक्रम घेण्यात येत असून पुढील चार दिवस हा कार्यक्रम घेण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

     शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असून त्याचाच भाग मोफत आभा कार्ड व आयुष्यमान भारत कार्ड वाटप कार्यक्रम घेण्यात येत असून आतापर्यंत श्रीबाग मधील ३७८ व एस.टी.स्टॅंड जवळ आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ५०० असा एकूण ८७८ जणांनी याचा लाभ घेतला असून अजून पुढील चार दिवस हा कार्यक्रम घेण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

फॉलोअर