कोर्लई,ता.२१(राजीव नेवासेकर) मुरुडच्या परेश नाका ते मारुती नाका रस्त्यावर तहसीलदार कार्यालयासमोर रस्त्यावर गेल्या अनेक दिवसांपासून खड्डे पडले असून याकडे संबंधित बांधकाम खात्याच्या दुर्लक्षाबाबत नाराजी व्यक्त होत खड्डे बुजविण्याची मागणी केली जात होती.याची दखल घेऊन या रस्त्यावरील खड्डे बांधकाम खात्याने बुजविण्यात आले आहेत.
परेश नाका ते मारुती नाका मुख्य रस्त्यावर तहसीलदार कार्यालय,वनविभाग, सेतू, न्यायालय, पोष्ट आदी.महत्वाची कार्यालये असून या ठिकाणी विविध कामांसाठी तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते.या रस्त्यावर गेल्या अनेक दिवसांपासून खड्डे पडले असून वेळप्रसंगी अपघाताची शक्यता लक्षात घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी यात लक्ष पुरवून पावसाळ्यापूर्वी येथील खड्डे बुजविण्याची मागणी केली जात होती.संबधित बांधकाम खात्याने अखेर दखल घेऊन या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात आले आहेत.मात्र सदरचे भर पावसात बुजविण्यात आलेले खड्डे किती टिकतील यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या