कोर्लई,ता.२१(राजीव नेवासेकर) महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे परदेशात अभ्यास दौऱ्याचे आयोजन लवकरच शासनाच्या कृषी खात्याकडून होणार असल्याचे खात्रीलायक वृत्त असून केंद्र सरकारच्या पोर्टलवर आपण शेतकरी असल्याची नोंद करून घ्यावी,ज्यामुळे अभ्यास दौऱ्यात आपत्ती येणार नाही,तेव्हा आताच नोंदणी करावी.असे आवाहन कृषी मित्र रायगड भूषण प्रा.डॉ.जयपाल पाटील यांनी ईच्छूक शेतकऱ्यांना केले आहे.
यामधे शेतकऱ्यांचे ज्ञान आणी क्षमता उंचावण्यास देशाबाहेर सन 2025-26 योजना अंतर्गत राबवणार असुन 1)युरोपला 12दिवसाचा2) ईस्त्राईलला 9 दिवस 3)जपानला10दिवस 4)मलेशियाला,व्हिएतनाम,फिलिपिन्स12 दिवस 5)चीनला 8 दिवस 6)दक्षिण कोरीयाला 10 येथील शेतकरी वर्गा सोबत हितगुज, चर्चा,शेतकऱ्यांच्या संस्थाना भेटी, आधुनिक तंत्रज्ञान, व्यवस्थापन माहीती,आपल्या शेतीमालाची निर्यात या बाबीवर चर्चा भेटी देऊन देवाणघेवाण होणार आहे.
याशेतकरी अभ्यास दौऱ्याचे नियोजन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री,एकनाथ शिंदे,अजित पवार यांनी केल्याबद्दल सर्व शेतकऱ्यां तफॆ आभार,शेतकऱ्यांची प्रगती म्हणजे राज्याच्या विकासात भर पडेल.यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी आपली शेतकरी म्हणून नोंदणी करावी.असे आवाहनही प्रा.डॉ.जयपाल पाटील यांनी केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या