कोर्लई,ता.२३(राजीव नेवासेकर)मुरुडच्या अंजुमन इस्लाम जंजिरा संस्था कार्यकारिणी निवड करण्यात न आल्यास याविरोधात आपण रविवार दि.२७ जुलै २०२५ रोजी संस्थेच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते साकिब गजगे यांनी मुख्य कार्यालयाला निवेदनाद्वारे देण्यात आला आहे./
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, दि. २८/०२/२०२५ रोजी न्यासाच्या नियमानुसार आपल्या संस्थेचे मागील १० ते १२ वर्षे निवडणूक न झाल्यामुळे मी निवडणूक होणेकरीता मी आमरण उपोषण केले होते. सदर उपोषणाचे पहिल्याच दिवशी सचिव अंजुमन इस्लाम जंजिरा यांनी न्यासाच्या नियमानुसार निवडणूक घेणे ही आपली मागणी रास्त व बरोबर असल्यामुळे मला लेखी पत्र जा.क. AlJ/2/494/2024-25 दि. २८/०२/२०२५ चे पत्र देवून सदर पत्रामध्ये निवडणूक घेणेकरीता दिनांक २७ जुलै २०२५ पर्यन्त अशी पाच महीन्याची मुदत मा. पोलीस निरिक्षक मुरुड व इतर मान्यवर यांचे समक्ष मागून घेतली, उपस्थित सर्वांचा मान ठेवून मी माझे आमरण उपोषण त्या दिवशी सोडले.
अंजुमन इस्लाम जंजिरा संस्थेचे सचिव यांनी दि. २०/०६/२०२५ रोजी जा. क्र. AJ/19/537/2025-26 या पत्राव्दारे नविन निवडणूकीकरीता नविन सभासदांची प्रत्येक गावातून मुस्लीम समाजातून सभासदांची मागणी केली. व प्रत्येक गावातील मुस्लीम समाजाने सदर पत्रानुसार सदस्यांची नावे अंजुमन इस्लाम जंजिरा या संस्थेस दिली.
परंतु दि. २८/०७/२०२५ जा.क्र. AIJ/19/564/2025-26 सचिव अंजुमन इस्लाम जंजिरा यांनी या पत्रामध्ये निवडूक दि. २८ डिसेंबर २०२५ रोजी घेण्यांत येईल असे जाहीर केले आहे.
वास्तविक आपण निवडणूक घेणेकरीता पाच महीन्याची मुदत घेतलेली असताना त्या विहीत मुदतीत आपण निवडणूक न घेता आपण संस्थेची, ट्रस्ट (न्यास कार्यालय) समस्त मुस्लीम समाजाची सर्वांची फसवणूक करीत आहात, आपल्या संस्थेमध्ये आपण आपल्या पदाचा गैरवापर करुन फार मोठा भ्रष्ट्राचार केला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून आपण जाणून बुजून निवडणूक लावण्यांस टाळाटाळ करीत आहात.
या पत्राव्दारे मी आपणांस दि. २७ जुलै २०२५ जे निवडणूक घेण्याची यापुर्वीच ठरलेल्या तारखेस निवडणूक जाहीर न केल्यास दि. २७ जुलै २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजल्यापासून मी संस्थेच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार आहे. दि. २७ जुलै २०२५ रोजी या दिवशी एकतर निवडणूक होईल किंवा माझे आमरण उपोषण होईल यामध्ये कोणतीही मध्यस्थी होणार नाही.याची नोंद घ्यावी.
यात माझे जिवीताचे काही बरेवाईट झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदार अंजुमन इस्लाम जंजिरा या संस्थेच्या पदाधिकारी यांची राहील.असे साकिब गजगे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले असून सदर निवेदनाच्या प्रती अध्यक्ष वक्ब बोर्ड-औरंगाबाद,जिल्हाधिकारी-रायगड (अलिबाग),धर्मादाय आयुक्त-मुंबई, रायगड,तहसीलदार, पोलिस निरीक्षक-मुरुड यांना देण्यात आल्या आहेत.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या