कोर्लई,ता. ७, (राजीव नेवासेकर) मुरुड तालुक्यातील नांदगाव येथे ओकिनावा शोरीन रियू कराटे डो उडेन टी कोबुजुत्सू असोसिएशनच्या वतीने नुकतेच संपन्न झालेल्या कराटे प्रशिक्षण शिबीरात रायगड जिल्ह्यातील नऊ कराटेपट्टूंनी ब्लॅक बेल्ट पदविका पटकाविली. यात मुरुड तालुक्यातील मजगांव चे दोन आणि अलिबाग तालुक्यातील सात खेळाडूंचा समावेश आहे.
क्योशी विजय चंद्रकांत तांबडकर आणि साहाय्यक परीक्षक रेंन्शी अभिषेक गजानन तांबडकर तसेच प्रशिक्षक सेन्सय प्रियांका गुंजाळ व सेन्सय सिध्देश सतविडकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रगत कराटे प्रशिक्षण शिबीर व ब्लॅक बेल्ट पदविका परीक्षा घेण्यात आल्या.
याशिबिरात रायगड जिल्ह्यांतील खेळाडूंनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. यामध्ये मुरुड तालुक्यातील मजगाव येथील काव्या केतन नाक्ती व रेश्मा मंगेश भोईर आणि अलिबाग तालुक्यातील वेदांत संदेश सुर्वे, नम्रता गणेश चव्हाण, मल्हार संदेश गुंजाळ, सृष्टी अभय म्हामुणकर, सानवी सौरभ म्हात्रे, देवदत्त मनिष पडवळ, हार्दिक संतोष अकोलकर यांनी चमकदार कामगिरी करून ब्लॅक बेल्ट पटकाविला.
ब्लॅक बेल्ट पटकावणारे सर्व विद्यार्थ्यांनी यापूर्वी जिल्हा, विभाग व राज्य पातळीवर स्पर्धेत पदक मिळाले आहेत. त्यांच्या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत असून जिल्ह्यातील क्रीडा प्रेमिंकडून कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या