Type Here to Get Search Results !

विठ्ठलनामाच्या जयघोषात चिमुकल्यांनी काढलेल्या दिंडीने मुरुडकरांचे हरपले भान !


कोर्लई,ता.५(राजीव नेवासेकर)आषाढी एकादशीच्या निमित्ताने मुरुड शहरामध्ये साक्षात जणू पंढरी अवतरली होती. विद्यार्थ्यांनी काढलेली दिंडी मुरुड शहरात फिरत असताना साक्षात विठ्ठल व रुक्मिणी अवतरले असल्याचा अनुभव मिळाला. ही दिंडी पाहून मुरुडकर हरपून गेले होते. विठ्ठल नामाच्या जयघोषाने संपूर्ण मुरुड नगरी दुमदुमून गेली होती.

      आषाढी एकादशीचे औचित्य साधून मुरुडमध्ये सर्व शाळा, महाविद्यालयात दिंडी काढून आषाढी एकादशी साजरी केली जाते. यानिमित्ताने ओंकार बालवाडी, ओंकार विद्या मंदिर, ओंकार महाविद्यालयांच्या वतीने दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. या दिंडीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना हुबेहूब विठ्ठलासारखे व रुक्मिणीसारखे सजवण्यात आले होते. या वारीत विद्यार्थ्यांनी वारकरी रूपातील डोक्यावर पांढरी टोपी, सफेद सदरा आणि लेंगा परिधान केला होता. हातामध्ये टाळ चिपळ्या घेऊन विठ्ठल नामाचा जयघोष करीत होते. विद्यार्थिनींनी पारंपारिक नऊवारी साडी परिधान करून डोक्यावरती तुळस घेतली होती. त्यामुळे त्यामुळे संपूर्ण मुरुड शहरात साक्षर पंढरी अवतरली होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

फॉलोअर