कोर्लई,ता.११(राजीव नेवासेकर)शिवसंग्राम व मेटे परिवाराच्या वतीने लोकनेते विनायकराव मेटे यांच्या ६२ व्या जयंतीनिमित्त मुंबईतील रिदम हॉल, भारतीय क्रीडा मंदिर सहकार नगर,वडाळा (पश्चिम) मुंबई – ३७ येथे रविवार दिनांक १३ जुलै रोजी दुपारी ४:00 वाजता विशेष अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे.
"आठवणीतील मेटे साहेब" या आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस,उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे, शिवसंग्रामच्या राष्ट्रीय अध्यक्षा डॉ.ज्योती विनायकराव मेटे,अनेक समविचारी संघटनांचे पदाधिकारी, विविध क्षेत्रांतील मान्यवर, शिवसंग्रामचे प्रदेश कार्यकारिणीचे व जिल्ह्यातील पदाधिकारी, विविध सेलचे अध्यक्ष, मित्रपरिवार आणि हितचिंतक उपस्थित राहणार असल्याचे शिवसंग्रामचे रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश सावंत ह्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले असून स्व.विनायक मेटे यांच्या स्मृतींना, आठवणींना उजाळा देण्यासाठी आणि अभिवादन करण्यासाठी ह्या सोहळ्याचे शिवसंग्राम मुंबईच्या वतीने आयोजन करण्यात आले असल्याचे सांगितले .
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या