Type Here to Get Search Results !

मुरुड -तेलवडे परीसरात विनापरवाना वृक्षतोड ? वनविभागाने केला खैर तस्करीचा पर्दाफाश


कोर्लई,ता.११(राजीव नेवासेकर) मुरूड तालुव-यातील वनविभागाच्या क्षेञात येणा-या तेलवडे गावाच्या जवळील  खाजगी क्षेञात बेकायदेशीर सोलीव खैर लाकडाची तस्करी होत असल्याचे अज्ञात व्यक्तीकडून खबर मिळताच मुरुडच्या वनविभागाने कारवाई करत झाडाझुडुपांमध्ये लपवून ठेवलेली अंदाजे २० घन मीटर लाकडे पकडून या खैर तस्करीचा पर्दाफाश केला.

    वनविभागाला बुधवार दि.९ जुलै रोजी पहाटेच्या वेळेत अज्ञात व्यक्तीकडून खबर मिळताच मुरुड वनवविभागाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी वर्षा पौळ यांची टिम तेलवडे येथे पोहोचली व आजुबाजूच्या परिसरात पाहाणी केली असता मोठ्या प्रमाणात खैर तोड झाली असल्याचे व झाडाझुडपात ठेवलेली अंदाजे २० घन मीटर खैर लाकडे (नग) आढळून आले.

    वनविभागाचे उपवनसंरक्षक शैलेंद्र कुमार जाधव, सहाय्यक वनसंरक्षक आर.आर.चोबे यांच्या मार्गदर्शनाखाली मुरुड वनपरिक्षेत्र अधिकारी वर्षा पौळ, वनपाल राहुल कुलकर्णी, वनरक्षक विशाल ढोबळे, चेतन चव्हाण यांनी कारवाई करत खैराची लाकडे जप्त करण्यात आली असून माल सुडकोली विक्री आगार येथे जमा करण्यात आला असून वनपरिक्षेत्र अधिकारी वर्षा पौळ ह्या पुढील तपास करीत आहेत.

   वनविभागाच्या क्षेत्रात विनापरवाना बेकायदेशीर होणा-या तस्करी बाबत अवैध वृक्षतोड अथवा मालकी क्षेत्रात विनापरवाना वृक्षतोड होत असल्याचे आढळून आल्यास जबाबदार नागरिकांनी तातडीने वनविभागाशी संपर्क साधावा.असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी वर्षा पौळ यांनी केले आहे.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

फॉलोअर