(विशेष प्रतिंनिधी) मुरूड पोलीस ठाण्याच्या पथकाने केलेल्या कारवाईत चरस तस्करीच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. दिनांक 29 जून 2025 रोजी मध्यरात्री 1:49 वाजता आगरदंडा ते मुरूड दरम्यान स्कुटीवर प्रवास करणाऱ्या अलवान निसार दफेदार (वय 19, रा. सिध्दी मोहल्ला, मुरूड) याच्याकडे संशयावरून चौकशी केली असता, स्कुटीच्या डिकीमध्ये 776 ग्रॅम चरस हा अंमली पदार्थ सापडला. स्कुटीवर मागे बसलेला राजू खोपटकर मात्र घटनास्थळावरून फरार झाला.
सदर प्रकरणी सकाळी 9:12 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपासात एकूण 13 आरोपींच्या टोळीचा उलगडा झाला आहे. या टोळीचा प्रमुख विशाल रामकिशन जैसवाल (रा. उत्तर प्रदेश) असून, त्याने चरस हा अंमली पदार्थ नेपाळ व उत्तर प्रदेशहून आणला असल्याचे निष्पन्न झाले आहे.
विशाल जैसवालचे सहकारी आणि मदतनीस म्हणून खालील कार्यरत आरोपी :
1. अनुप राजेश जैसवाल (मुरूड)
2. अनुज विनोद जैसवाल (मजगांव)
3. आशिष अविनाश डिगे (काशिद)
4. प्रणित पांडुरंग शिगवण (सर्वे)
5. आनस इम्तियाज कबले (पेठ मोहल्ला)
6. वेदांत विलास पाटील (मजगांव)
7. साहिल दिलदार नाडकर (रोहा)
8. अनिल बंडु पाटील (मांडा, कल्याण)
9. सुनिल बुधाजी शेलार (फलेगांव, कल्याण)
10. राजु खोपटकर (मुरूड)
11. खुबी माखनसिंग भगेल (मुरूड)
या आरोपींच्या ताब्यातून एकूण 2 किलो 659 ग्रॅम चरस अंमली पदार्थ, किंमत अंदाजे 13,61,000 रुपये असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.गुन्ह्याचा तपास रायगड पोलीस अधिक्षक आँचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली मुरूड पोलीस ठाण्याचे प्रभारी सपोनि विजयकुमार देशमुख व त्यांच्या पथकाने — पोसई अविनाश पाटील, पोहवा जनार्दन गदमले, पोहवा हरी मेंगाल, पोना किशोर बठारे, पोशी अतुल बारवे — यांनी केला.या यशस्वी कारवाईमुळे मुरूड परिसरात अंमली पदार्थांच्या विरोधातील लढ्याला मोठे यश मिळाले आहे. पोलीस तपास सुरु असून आणखी आरोपींचा शोध घेतला जात आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या