कोर्लई,ता.२३(राजीव नेवासेकर) मुरुडच्या अंजुमन इस्लाम जंजिरा डिग्री कॉलेज ऑफ सायन्स, मुरुड महाविद्यालयात प्रभारी प्राचार्य डॉ.साजिद शेख यांच्या मार्गदर्शनाखाली इनक्युबेशन कमिटी आणि आजीवन शिक्षण व विस्तार विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने "उद्योजकता, स्टार्टअप आणि इनक्युबेशन सेंटर" या विषयावर ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथील स्कूल ऑफ लाईफ सायन्सचे संचालक प्रा. भूषण चौधरी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रा. चौधरी यांनी कार्यशाळेत विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेविषयी जागृती निर्माण करताना शासकीय योजना, कौशल्यविकास, नवोपक्रमाची संस्कृती आणि नेटवर्किंगचे महत्त्व यावर सखोल चर्चा केली. त्यांनी विद्यार्थ्यांना स्टार्टअप्सच्या संधींबाबत माहिती दिली आणि भविष्यातील करिअरमध्ये इनोव्हेटिव्ह विचार कसा महत्त्वाचा ठरतो. हे उदाहरणांसह समजावून सांगितले.
इनक्युबेशन कमिटी प्रमुख प्रा. जावेद खान आणि आजीवन शिक्षण व विस्तार विभागाचे प्रमुख रहीम बागवान यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. या उपक्रमात विद्यार्थी आणि प्राध्यापकवर्गाने मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या