कोर्लई,ता.२४(राजीव नेवासेकर)मुरुडच्याअंजुमन इस्लाम जंजिरा डिग्री कॉलेज ऑफ सायन्स, मुरुड जंजिरा येथे "स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२५" या मोहिमेअंतर्गत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद रायगड, पंचायत समिती मुरुड व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. साजिद एफ. शेख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
तालुका पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी मंगेश पाटील,कक्ष अधिकारी संजय वानखेडे,तालुका समन्वयक पाणी व स्वच्छता विभाग पंचायत समितीच्या श्रेया गद्रे, डेटा एन्ट्री सहाय्यक अविनाश पाटील हे उपस्थित होते.
स्वच्छतेच्या महत्त्वावर भर देत ग्रामीण भागातील नागरिकांनी स्वच्छतेसाठी सजग राहण्याचे आवाहन उपस्थित मान्यवरांनी केले तसेच एसबीएमएसएसजी २०२५ ह्या अँपद्वारे सर्वेक्षण करण्यासाठी मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. साजिद एफ. शेख यांनी मुरुड मधील विद्यार्थी यांनी स्वतः व आपल्या आसपासच्या नागरिकांना या स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२५ मध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन आपले मुरुड स्वच्छ गावांच्या यादीत समाविष्ट व्हावे यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन उपस्थितांना केले.
या कार्यक्रमाच्या आयोजनात राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. फिरोज शेख, प्रा.अल्ताफ फकीर, प्रा. जावेद खान, प्रा. शोएब खान व ग्रंथपाल अंजुम दाखवे यांनी विशेष सहकार्य केले. विद्यार्थी प्रतिनिधी हुमेरा घार,अज्बा चापेकर, आयशा देशमुख, सफा हम्दुले व इतर सर्व विद्यार्थ्यांनी व प्राध्यापकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहभाग नोंदवला. स्वच्छ भारत मिशनच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल म्हणून या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या