अलिबाग नगरपरिषद उर्दूशाळा विद्यार्थ्यांचा गुणगौरव
कोर्लई,ता.३१(राजीव नेवासेकर) अलिबाग येथील नजात सोशल अँड एज्युकेशनल ट्रस्टतर्फे नगरपरिषदेच्या स्व.नमिता नाईक सभागृहात उर्दू शाळेतील दहावीतील(बॅच २०२४-२५) उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा कैसर दणदणे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाला.
अलिबाग नगरपरिषदेच्या माजी उपनगराध्यक्षा ॲड.मानसी म्हात्रे,नजात सोशल अँड एज्युकेशनल ट्रस्ट, अलिबागचे संस्थापक अध्यक्ष लायन डॉ. साजिद शेख व सहसचिव फिरदौस शेख,उर्दू माध्यमिक शाळा व्यवस्थापन समिती सदस्य रमजान सय्यद,उर्दू प्राथमिक शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष आरिफ हकीम,उर्दू माध्यमिक शाळा शिक्षक,पालक समिती अध्यक्ष शाहनवाज शेरखान, मुख्याध्यापिका सबिहा चिविलकर व फरहीन धायरेकर यावेळी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी दहावीतील यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या तर नजात सोशल अँड एज्युकेशनल ट्रस्ट, अलिबागचे संस्थापक अध्यक्ष लायन डॉ. साजिद शेख यांच्या तर्फे पुष्पगुच्छ व फोल्डरफाइल बक्षिस देऊन गौरविण्यात आले.
माजी उपनगराध्यक्षा ॲड.मानसी म्हात्रे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना,विद्यार्थ्यांनी उच्चधेय्य गाठण्याचे स्वप्न पाहावे व त्यासाठी प्रयत्न करावेत. शिक्षण हेच एकमेव हत्यार आहे जे आपल्याला यशाच्या शिखरावर पोहचवते असे सांगून स्व. नमिता नाईक यांच्या योगदानाची आठवण करून दिली.
नजात सोशल अँड एज्युकेशनल ट्रस्ट,अलिबागचे संस्थापक अध्यक्ष लायन डॉ. साजिद शेख यांनी विद्यार्थ्यांना वेळेचे महत्व पटवून देऊन चिकाटीने ध्येय गाठण्यासाठी वेळेचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने करून आयुष्यात यशस्वी होण्यासाठी व शाळेचे, शिक्षकांचे व पालकांचे नाव लौकिक करण्याचा सल्ला दिला. नजात सोशल अँड एज्युकेशनल ट्रस्ट व उर्दू शाळेच्या शिक्षकवृंदांनी कार्यक्रमाचे उत्तम प्रकारे आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग, पालक आणि विद्यार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या