
अंजुमन इस्लाम जंजिरा संस्था ही मुंबई विभागासहित रायगड जिल्ह्यातील मुरुड,श्रीवर्धन व म्हसळा या तालुक्यातील ७५ पेक्षा अधिक गावातील शिक्षण क्षेत्रात काम करत आहे. या संस्थेच्या निवडणुका २७ जुलै रोजी पार पडल्या.या निवडणुकीत १ मुख्य कार्यकारी मंडळ तर ४ विभागीय कार्यकारी मंडळ कमिटीची निवड करण्यात आली. या संस्थेच्या मुख्य कमिटीत जेष्ठ अभ्यासू कार्यकर्ते नाजीम चोगले यांची सर्वानुमते अध्यक्षपदी तर सचिवपदी निसार बिरवाडकर, सहसचिवपदी अ.समद मुहीबुल्ला नजीर ( मेंदडी ) त्याचप्रमाणे अव्वाब हबीब फकीह यांची खजिनदारपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
चार विभागीय कमिटी पैकी मुरुड संस्थेच्या अध्यक्षपदी लियाकत कासकर ( राजपुरी), सचिवपदी इम्तियाज मलबारी ( मजगांव ) व कार्यकारणी सदस्यपदी रिदवान फहिम यांची निवड करण्यात आली.
म्हसळा विभागीय कमिटी अध्यक्षपदी फझल हलडे, सचिवपदी मजहर काझी तर कार्यकारी मंडळ सदस्य म्हणून निसार फिरफिरे यांची निवड करण्यात आली.
मुंबई विभागीय अध्यक्षपदी डॉ. खलील मुन्शी, सचिव अबीद हनवारी तर कार्यकारी मंडळ सदस्य म्हणून नय्यर शाबान यांची निवड करण्यात आली.
गोंडघर विभागीय अध्यक्ष म्हणून मुनाफ पस्वारे, सचिव सरफराज दर्जी तर कार्यकारी मंडळ सदस्य म्हणून जाहिद रिजवी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. निवडून आलेल्या सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी व सदस्यांचे मुस्लिम समाज बांधवांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या