कोर्लई,ता.१८(राजीव नेवासेकर)दि. १८ जुलै १८५७ रोजी स्थापन झालेल्या व संपूर्ण देशाच्या जडणघडणीत महत्त्वाचा वाटा उचलणाऱ्या आणि जगाला नवी दिशा देणा-या गुणवंत, किर्तीवंत विद्यार्थी घडवणाऱ्या मुंबई विद्यापीठाच्या १६९ व्या स्थापना दिनानिमित्त मुरुडच्या अंजुमन इस्लाम जंजिरा डिग्री कॉलेज ऑफ सायन्स महाविद्यालयात प्राचार्य डॉ. साजिद शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरणपूरक उपक्रम राबवण्यात आला.यादिवशी महाविद्यालयात पंचक्रोशीतील गरजु व्यक्तींना फळ रोपांचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमात विद्यार्थ्यांनी आणि प्राध्यापकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान अंजुमन इस्लाम जंजिरा डिग्री कॉलेजचे चेअरमन माननीय जैनुद्दीन कादरी यांनी भूषवले. पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक जबाबदारी या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात गरजू व्यक्तींना एकूण ५० फळझाडांची रोपे वितरीत करण्यात आले.
अंजुमन इस्लाम जंजिरा डिग्री कॉलेजचे चेअरमन जैनुद्दीन कादरी यांनी मुंबई विद्यापीठाच्या स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. साजिद शेख यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात विद्यापीठाच्या शैक्षणिक योगदानाचा गौरव करुन विद्यार्थ्यांना सामाजिक भान व पर्यावरण संवर्धनासाठी पुढे येण्याचे आवाहन केले.
राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी डॉ. फिरोज शेख, प्रा. अल्ताफ फकीर, आजीवन शिक्षण व विस्तार विभागाचे समन्वयक प्रा. रहीम बागवान, प्रा. जावेद खान, ग्रंथपाल अंजुम दाखवे, महाविद्यालयातील सर्व अध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.सुत्रसंचालन प्रा. स्वालेहा कारभारी यांनी केले.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या