Type Here to Get Search Results !

मुरुड तालुका पंचायत समितीत घनकचरा व्यवस्थापन सभा

कोर्लई,ता.२४(राजीव नेवासेकर) मुरुड तालुका पंचायत समिती सभागृहात गटविकास अधिकारी राजेंद्रकुमार खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली घनकचरा व्यवस्थापनाबाबत एका सभेचे आयोजन करण्यात आले.

       यावेळी गटातील सर्व ग्रामपंचायत अधिकारी, सरपंच/प्रशासक, उपसरपंच व आम्ही संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती.परेरा मॅडम  उपस्थित होत्या.

    तालुक्यातील ग्रामपंचायत हद्दीतील वाढत्या कचऱ्याचे व्यवस्थापनाची समस्या सोडवण्यासाठी मुरुड तालुक्याचे गटविकास अधिकारी राजेंद्रकुमार खताळ यांनी हे उचललेले पाऊल उल्लेखनिय असून सर्व ग्रामपंचायतीमध्ये भेडसावणारा कचऱ्याचा प्रश्न हा ग्रामपंचायत व आम्ही संस्था यांच्या संयुक्त प्रयत्नाने लवकरात लवकर निकाली काढण्याबाबत चर्चा करण्यात आली.यावेळी कोर्लई ग्रामपंचायत सरपंच राजश्री मिसाळ यांनी सर्वांच्या वतीने योग्य प्रकारे कचरा व्यवस्थापन कामे पुर्ण करण्याबाबत उपस्थित सरपंचांना आवाहन केले.

    यावेळी सहा.गटविकास अधिकारी मंगेश पाटील साहेब, विस्तार अधिकारी प्रसाद माळी, आरोग्य विस्तार अधिकारी वाडेकर, कृषी विस्तार अधिकारी वसंत दळवी, तालुका समन्वयक श्रेया गद्रे उपस्थित होत्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

फॉलोअर