मुरुडमध्ये ‘दहा हजार व्याज’ आमिषानं कोट्यवधींची फसवणूक; प्रसन्न पुलेकर अटकेत
Raigad Maza Newsजुलै १७, २०२५0
रायगड(विशेष प्रतिंनिधी )मुरुड शहर व ग्रामीण भागातील नागरिकांना दरमहा ₹१०,००० व्याज देण्याचे आमिष दाखवून, प्रत्येकाकडून किमान ₹१,००,००० अशी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक स्वीकारून नंतर पैसे देण्यास नकार देणाऱ्या प्रसन्न पुलेकर या फसवणूक करणाऱ्याला मुरुड पोलीसांनी अटक केली आहे.
या प्रकरणात मुख्य तक्रारदार महेश भगत यांच्या तक्रारीसह आणखी १३६ नागरिकांनी पोलिसांत फसवणुकीच्या तक्रारी दाखल केल्या असून एकूण फसवणुकीची रक्कम ₹८ कोटी १.२५ लाख इतकी असल्याची माहिती समोर आली आहे.
पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपास सुरू केला होता. प्रसन्न पुलेकर मुरुड दिवाणी न्यायालयात एका प्रकरणासाठी आला असता त्याला ताब्यात घेण्यात आले.
त्याच्यावर भारतीय दंड संहिता कलम ४२० (फसवणूक), कलम ४०६ (विश्वासघात) आणि अनियंत्रित योजना बंदी कायदा २०१९ अंतर्गत कलम ३, ४, ५, २१, २२, २३ नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
लोकांनी जास्त व्याज मिळवण्यासाठी लाखो-कोट्यवधी रुपये गुंतवले, मात्र वेळेत परतावा न मिळाल्याने आपल्या फसवणुकीची जाणीव होऊन त्यांनी पत्रकार परिषद आणि पोलिस अधीक्षक, रायगड यांच्याकडे तक्रार दिल्यानंतर अखेर कारवाई घडून आली.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या