कोर्लई,ता.१७(राजीव नेवासेकर)मुरुडच्या जंजिरा विद्या मंडळ संचलित मॉर्निंग स्टार प्री-प्रायमरी व प्रायमरी स्कूलची शैक्षणिक सत्र २०२५ -२०२६ ची पालक शिक्षक सहविचार सभा सर एस ए हायस्कूलच्या गणेश सभागृहात उत्साहात संपन्न झाली.
यावेळी संस्थेच्या उपाध्यक्षा प्रतिभा जोशी,संचालक पांडुरंग आरेकर ,उदय दांडेकर , उत्कर्षा गुंजाळ , ग्रंथपाल उल्हास गुंजाळ, मुख्याध्यापक सरोज राणे,मॉर्निंग स्टारच्या मुख्याध्यापिका तसेचआदिश्री जोशी तसेच बहुसंखेने पालक वर्ग उपस्थितीत होता.
सुरुवातीला सर्व उपस्थितांचे स्वागत करण्यात येऊन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. मुख्याध्यापिका आदिश्री जोशी यांनी वर्षभरात होणारे उपकम व कार्यकमाची माहिती दिली. तसेच शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षक पालक संघ समिती शासनाच्या नियमा नुसार स्थापन करण्याची प्रकिया पूर्ण केली.यावेळी शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी प्रतिभा जोशी यांची निवड करण्यात आली. शिक्षक पालक समितीच्या अध्यक्षपदी आदिश्री जोशी व उपाध्यक्ष पदी सर्व पालकांच्या सहमतीने उत्केष वाणी यांची निवड करण्यात आली.या सभेत काही पालकांनी समस्ये संदर्भात प्रश्न उपस्थित केल्यानंतर मुख्याध्यापिक व संचालक यांनी त्याची पूर्तता करण्याचे आश्वासन दिले. शेवटी प्रतिभा जोशी यांनी मनोगतात या शाळेचे अनेक विद्यार्थी नामांकीत झाले असून त्यांचे पाय जमिनीवर हे शाळेचे संस्कार असल्याचे नमूद केले. येथील शिक्षिका पूर्ण पणे प्रशिक्षित असून तुमच्या मुलांसाठी अल्पशा पगारावर काम करत असून त्यांचा त्याग महत्वाचा आहे. सर्व पालकांनी देखील आपल्या पाल्याकडे लक्ष देण्याची विनंती केली.हा कार्यकम यशस्वी करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा प्रतिभा जोशी,मयुरी ठाकूर,विरेंद्र गुरव,भक्ती गुरव, अक्षता भोसले, सुशांत सतविडकर,नम्रता चव्हाण , सिया अपराध यांच्या सहकार्याने तसेच मुख्याध्यापिका आदिश्री जोशी,उपाध्यक्ष उत्केष वाणी, मयुरी काळे,अश्लेशा नाक्ती, स्नेहल शेळके,कार्तिकी चाफेकर, निकेश खोत, विनया दिवेकर, शिल्पा मसाल या पालकांनी तसेच महेश भोईर, वैशाली म्हात्रे , शिल्पा मसाल, जोती पाटील, श्रृती तांबे, काव्या अपराध, मानसी माळी, समृद्धी गुरव,कर्मचारी सोनल घराणे व प्रतिभा गायकर या सर्वांनी परिश्रम घेतले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश भोईर यांनी तर कुलाबकर मॅडम यांनी आभार मानले.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या