कोर्लई,ता.१५(राजीव नेवासेकर)मुरूड तालुक्यातील २४ ग्रामपंचायतीचे सरपंच आरक्षण मुरुड तहसीलदार आदेश डफळ यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिती मधील डॉ.ति.श्री. नानासाहेब धर्माधिकारी सभागृहात घेण्यात आली.
यावेळी तहसीलदार -आदेश डफळ,निवासी नायब तहसीलदार -संजय तवर, सहाय्यक गटविकास अधिकारी -मंगेश पाटील, -संजय वानखडे, खुषाल राठोड, पंचायत समिती विस्तार अधिकारी -प्रसाद माळी, कृषि विस्तार अधिकारी- वसंत दळवी,प्रतिक पावसकर, धनंजय साक्रुडकर, व तालुक्यातील राजकीय पक्षांचे कार्यकर्ते पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.
यावेळी मुरुड तहसीलदार यांनी २४ ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच आरक्षण २०२५ ते २०३० या कालावधीसाठी सरपंच आरक्षण बाबत माहिती दिली.
या मध्ये विहुर ग्रामपंचायत थेट सरपंच करिता सोडती शिवाय अनु.जाती महिला आरक्षण घोषित करण्यात आले.
नागरिकांचा मागास प्रवर्ग १७ ग्रामपंचायत सरपंच करिता सर्वच्या समोर प्लास्टिक डब्यात १७ चिठ्ठ्या टाकण्यात आल्या.या डब्यातुन ४थीत शिकणारा विद्यार्थी उजेफा शरफात शेख यांनी एक एक करत चिठ्ठ्या उचल्या या मध्ये कोर्लेई,मजगाव,शिघ्रे,साळाव ,मिठेखार,मांडला ,तर आंबोली ग्रामपंचायत सोडती शिवाय नागरिकांचा मागास प्रवर्ग आरक्षण घोषित करण्यात आले.
सर्वसाधारण आरक्षण करिता ८ ग्रामपंचायत मधुन तेलवडे,चोरढे या २ ग्रामपंचायत सोडत करण्यात आली.
ग्रामपंचायत सरपंच पदाकरीता अनु .जमाती खुला या मधुन बोर्ली ,एकदरा राजपुरी ,तर ग्रामपंचायत सरपंच पदाकरीता अनु .जमाती महिला करिता वळके व तळेखार असणार आहे.
ग्रामपंचायत सरपंच पदाकरीता नागरिकांचा मागास प्रवर्ग खुला कोर्लई ,मजगाव, शिघ्रे तर
ग्रामपंचायत सरपंच करिता नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आंबोली ,साळाव,मिठेखार,मांडला असणार आहे.
ग्रामपंचायत सरपंच पदाकरीता सर्वसाधारण खुला करिता सावली,उसरोली,आगरदांडा,वेळास्ते,काशिद,काकळघर, तर
ग्रामपंचायत सरपंच पदाकरीता सर्वसाधारण महिला करिता वावडुंगी, नांदगाव,भोईघर,चोरढे,तेलवडे हे असणार आहे.
यावेळी राजकीय पक्षांनी आपल्या समस्या मांडल्या त्यावर तहसीलदार आदेश डफळ यांनी सकारात्मक उत्तर देऊन समस्या दुर केल्या.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या