कोर्लई,ता.१४(राजीव नेवासेकर)मुरुड- अलिबाग रस्त्यावर बारशीव गावाच्या परिसरात रविवारी (दि.13) रोजी संध्याकाळी भीषण अपघात झाल्याची घटना घडली. या प्रकरणी कारचालकावर मुरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार,मोटार सायकल स्वार अक्षय किसनलाल जयस्वाल (२७) व लालचंद रामप्रसाद गौड(३५) रा. भोगेश्वरपाखाडी- मुरुड हे रेवदंडा बाजूकडून मोटारसायकल क्रमांक MH06 BK8031 मोटारसायकलने मुरुडकडे प्रवास करीत असताना बारशिव गावाजवळ कार क्रमांक MH 06 BU2744 कारची त्यांना धडक लागून दोघेही गंभीर दुखापती झाल्याने जागीच मयत झाले आहेत. अपघाताची तीव्रता इतकी होती की, दुचाकीचा अक्षरशः चक्काचूर झाला. या अपघातानंतर कार चालक तात्काळ घटनास्थळावरून पळून गेला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. मनसेच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी मुरुड पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात कार चालकाविरोधात गुन्हा दाखल केला. या अपघातातील आरोपी संदीप प्रभाकर म्हात्रे यास रेवदंडा पोलिसांनी रोहा तपासणी नाका येथून ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेमुळे रस्त्यांवरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पोलीस पुढील तपास करीत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या