मुरुड,ता.१५(पांडुरंग आरेकर)मुरुड पोलीस स्टेशन येथे पोलिस निरीक्षक परशुराम कांबळे यांनी आपला पदभार स्वीकारल्यानंतर सर्व प्रथम मुरुड तालुक्यात कायदा व सुव्यवस्था चांगली राहण्यासाठी शांतता समितीच्या सदस्यांची सभा घेऊन तातुक्यातील असणाऱ्या व त्यांचे निराकरण कश्या प्रकारे करता येईल या दृष्टीने सभेचे आयोजन केले.सर्व सभासदां कडून समस्यांबाबत प्रत्येकाचे विचार ऐकून घेतले.त्या समस्यांवर मात करून शांतता कशी राहील. याबाबत प्रत्येकाची मते मांडण्यास सांगितले .
यावेळी राशिद फहिम,बाबु सुर्वे,विश्वास चव्हाण , जाहिद फगजी,फैसल उलडे,जमिर शेख,शाहिस्ता शेख,मुस्सदिक कादिरी,मंदा ठाकूर आदी.सदस्यांनी तालुक्यातील भटकी कुत्री,मोकाट जनावरे ,वीज तसेच रात्री उशिरा पर्यंत घराबाहेर फिरणारे इत्यादी बाबतच्या समस्यांचे निराकरण करण्याची नागरिकांच्या वतीने मांडण्यात आले व आपल्या खात्यास या बाबत सहकार्य करण्याचे अभिवचन दिले. प्रत्येक शांतता समितीची प्रोसिडींग लिहून त्याची अंमलबजावणी झाली की नाही या बाबत पुढील सभेत त्याचे वाचन व्हावे ही विनंती करून पुढील सभेस आपण स्वतः तहसिलदार व मुख्या धिकारी सोबत संयुक्त सभा घेण्याचे सुचित केले .यावर पोलिस निरीक्षक परशुराम कांबळे साहेब यांनी कायद्याच्या चौकटीत राहून काम केले जाईल , कायद्या समोर सर्व समान असतील, आपल्या सर्वांच्या सहकार्या ने समस्या सोडवून शांतता राखू,आपण देखील समस्या बाबत जागृकतेने आम्हास कळविल्यास निश्चित कारवाई केली जाईल.असे आश्वासन दिले.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या