कोर्लई,ता.१२(राजीव नेवासेकर) रायगड जिल्हा जेष्ठ नागरिक संघाच्या समन्वय समितीवर ज्येष्ठ पत्रकार संपादक बळवंत वालेकर यांची कार्यकारिणी सदस्य निवड करण्यात आल्याबद्दल सर्वत्र कौतुक व अभिनंदन केले जात आहे.ही निवड करण्यात आल्याचे जिल्हा समन्वय समितीचे अध्यक्ष सुरेश पालकर (गोरेगाव -माणगाव) यांनी एका पत्राद्वारे कळविले आहे.
अलिबाग तालुक्यातील कामार्ले विभाग वाघोली येथील ज्येष्ठ नागरिक संस्थेचे बळवंत वालेकर संस्थापक असून विद्यमान सल्लागार आहेत . या संस्थेची वास्तु उभारण्यात त्यांचे मोलाचे योगदान लाभले असून अलिबाग ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या कार्यकारिणीवर २९ वर्षे कार्यरत होते .
ज्येष्ठ नागरिकांनी एकत्रित येऊन आपली सुख - दुःखे "शेअर" करावीत,फावला वेळ स्वच्छंदपणे दवडण्यासाठी गावोगावी ज्येष्ठ नागरिक संघ स्थापन करून त्यांच्या अडिअडचणी सोडविणे तसेच शासनाच्या विविध योजना समजावून देण्यासाठी विभागवार मेळावे आयोजित करून ज्येष्ठ नागरिकांना प्रोत्साहित करणे हे जिल्हा समन्वय समितीचे प्रमुख काम आहे. रायगड जिल्ह्यात २७५ कार्यक्षम ज्येष्ठ नागरिक संघ आहेत.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या