#PAKISTAN BOYA अखेर रेवदंडा समुद्र किनारी सापडला पाकिस्तान बोया
Raigad Maza Newsजुलै १३, २०२५0
रायगड (विशेष प्रतिंनिधी)भारत सरकारने राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानसोबतचा सिंधू करार स्थगित करीत तसेच ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानला चांगलीच चपराक दिली आहे. यानंतर जवळपास दीड महिन्यानंतर रायगड जिल्ह्यातील रेवदंडा पोलिस स्टेशन हद्दीत असणाऱ्या कोर्लई समुद्र किनाऱ्यापासून तीन नॉटीकल मैल ( साधारण साडे पाच किलोमीटर अंतरावर) एक संशयीत बोट दिसली आहे. रेवदंडा नजीकच्या कोर्लई समुद्रात ही बोट दिसत असल्याची माहिती मिळाली होती.
यानंतर रायगड पोलिस दल आणि सुरक्षा यंत्रणा यांनी कोर्लई किनाऱ्यावरून बेपत्ता झालेल्या संशयास्पद पाकिस्तानी बोयाचा अखेर शोध लागला आहे. रायगड पोलिसांनी राबवलेल्या व्यापक सर्च ऑपरेशन दरम्यान हा बोया रेवदंडा-आंग्रेनगर किनाऱ्यावर शुक्रवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास आढळून आला, पोलिस सूत्रांनी ही माहिती दिली असून, पाच दिवसांपासून सुरू असलेल्या या शोध मोहिमेनंतर सुरक्षा यंत्रणांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.
रविवारी रात्री कोर्लई (मुरुड) येथे एक संशयास्पद बोट दिसल्यानंतर, पोलिसांनी संपूर्ण जिल्ह्यात शोध मोहीम सुरू केली आहे. पोलिसांनी अनेक ठिकाणी तपासणी नाके उभारले आहेत आणि किनारपट्टीवरील हॉटेल्स आणि लॉजची तपासणी करीत होते. रायगड पोलिसांनी जिल्ह्यात जिल्यातील सागरी किनारी तसेच खाडी किनारी असलेल्या ठिकाणी जवळपास साडेतीन हजार बोटीची तपासणी केली असता त्यामध्ये २८७बोटी बिननोंदणीकृत बोटी किनारपट्टीवर असल्याचे आढळून आले आहे. तर जवळपास सहाशे हून अधिक बोटींच्या मालकाचा शोध सुरू आहे. रायगड जिल्ह्यातील काही बोटी या नवी मुंबई पोलिस आयुक्त कार्यक्षेत्रात देखील असल्याने त्यांची देखील तपासणी करण्यात आली.सदर4शोध मोहीम 5आणि तपासणी ही पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली ५२ अधिकारी आणि सहाशे पोलिस कर्मचारी यांच्या मदतीने पोलिसांनी संपूर्ण रायगड जिल्हा पिंजून काढला.
ही घटना ६ जुलै रोजी रात्री घडली होती. कोलंई किल्ल्याजवळ ‘मुकादर बोया ९९ (एमएमएसआयः ४६८००४११) नावाची एक बोट आढळली होती. प्रथमदर्शनी ती बोट संशयास्पद वाटल्याने खळबळ उडाली होती. समुद्रात एक संशयास्पद बोट आढळल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माणझाले होते.या घटनेमुळे परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली होती. या संशयित बोटीबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी तपास यंत्रणा प्रयत्नशील होती. प्राथमिक तपासानुसार ही बोट पाकिस्तानातून आलेली असावी, अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. घटनेची माहिती मिळताच भारतीय तटरक्षक दल, नौदल व केंद्र सरकारच्या सुरक्षा यंत्रणांनी तात्काळ लक्ष घालून स्थानिक पोलिसांना सतर्क केले.
पोलिसांच्या तपासात पुढे स्पष्ट झाले की, ही बोट नसून ती एक बोया म्हणजेच समुद्रातील मार्गदर्शक चिन्ह आहे. मात्र, बोया बेपत्ता झाल्याने आणि त्याचा पत्ता लागत नसल्याने सुरक्षा यंत्रणांची चिंता वाढली होती. त्यामुळे पाच दिवस सातत्याने शोधमोहीम राबवण्यात आली. रेवदंडा समुद्रकिनाऱ्यात जे आढळलं होतं तो बोटीचा केवळ एक छोटा भाग(बोया )होता. सबंधित बोट ही पाकिस्तानच्या कराचीमध्येच आहे. मासेमारी बोटीचा बोया असल्याने त्याला जीपीएस ट्रॅकर आहे. या ट्रॅकरमुळेच भारतीय नौदलाने बोटीची ओळख पटवली आहे. मात्र मूळ बोट पाकिस्तानात असून बोटीचा काही अवशेष भारतात वाहून आल्याचं निष्पन्न झालं.
या मोहिमेत तटरक्षक दल, नौदल व स्थानिक पोलिस प्रशासनाने संयुक्तपणे सर्च व कोम्बिंग ऑपरेशन राबवत परिस्थितीवर बारीक नजर ठेवली होती. या घटनेच्या पार्श्वभूमीवर कोकण किनारपट्टीवरील समुद्री सुरक्षेचा आढावा घेण्याची गरज अधोरेखित झाली आहे. तज्ज्ञांच्या मते, समुद्रमार्गे घडणाऱ्या संभाव्य घुसखोरी रोखण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा, सॉफ्टवेअर व स्थानिक यंत्रणांचा समन्वय अधिक बळकट करणे काळाची गरज आहे. यासारख्या घटनांतून सतर्कतेचा इशारा मिळत असून, किनारपट्टी सुरक्षा यंत्रणांची सज्जता टिकवणे अत्यावश्यक बनले आहे.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे आणि कोणतीही संशयास्पद माहिती मिळाल्यास पोलिसांना त्वरित कळवावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
पाकिस्तानी अतिरेकी कसाब आणि त्याचे साथीदार हे कराची येथून मुंबईत समुद्रमार्गे दाखल होत त्यांनी मुंबई वर २६नोव्हेंबर रोजी हल्ला केला होता.त्य दहशतवादी हल्ल्यात अठरा सुरक्षा कर्मचाऱ्यांसह १६६ लोकांनी आपले प्राण गमावले होते. तर तीनशेहून अधिक लोक जखमी झाले होते. देशातील सर्वांत सुरक्षित ठिकाणांपैकी एक असलेल्या मुंबईतील ताज हॉटेलला दहशतवाद्यांनी लक्ष्य केलं होतं.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या