कोर्लई,ता.३(राजीव नेवासेकर) मुरुड तालुक्यातील उसरोली ग्रामपंचायत हद्दीतील दुर्गम ग्रामीण भागातील आदाड येथे सकाळच्या वेळेत शालेय विद्यार्थ्यांसाठी एस.टी.सेवा सुरु करण्यात यावी.अशी मागणी शिवसेनेचे शाखा प्रमुख नितेश पाटील यांनी ग्रामस्थांच्या वतीने केली आहे.अलिबाग-मुरुड मतदार संघाचे आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या कडे ही मागणी करण्यात आली आहे.
तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या आदाड गावातून सकाळच्या वेळेत मुरुड येथे विविध कार्यालयात कामकाजासाठी, बाजारहाट साठी जा-ये करणारे तसेच मुरुड येथील महाविद्यालय, हायस्कूल व नांदगाव यशवंत नगर हायस्कूलमध्ये जाणारे शंभर विद्यार्थी जा-ये करीत असतात.आदाड गावात एसटी.सेवेअभावी येथील लोकांना त्रास व हाल सहन करावा लागत आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी यात तातडीने लक्ष पुरवून मुरुड -आदाड सेवा सुरु करण्यात योग्य ती कार्यवाही करण्यात यावी.अशी मागणी नितेश पाटील यांनी ग्रामस्थांच्या वतीने केली आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या